Pune News: दामत्याचा २० दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट; २००८ साली केला होता प्रेमविवाह !

पुणे – वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या दांपत्याचा घटस्फोट २० दिवसात मंजुर झाला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.ए. बागे-पाटील यांनी हा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेम विवाह होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो.
या प्रकरणात दावा दाखल करतेवेळी दोघे नोव्हेंबर २०२२ पासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव (वय ४२) आणि माधवी (वय ४७) (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांतर्फे ॲड. कुमार माळवदकर, ॲड. नंदकिशोर येरंडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विवेक माळवदकर, ॲड. मुकुल महिंद्रकर यांनी सहकार्य केले. वकिलांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तो आणि ती दोघेही नोकरी करायचे. ती त्याच्यापेक्षा मोठी आहे.
तिचे दुसरे लग्न आहे. तिला पहिल्या पतीपासून मुलगी आहे. २४ ॉक्टोबर २००८ रोजी त्यांचा प्रेमविवाह झाला. काही दिवस सुरळीत संसार केला. त्यानंतर दोघात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. २७ सप्टेंबर २०२२ पासून वेगळे राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. काही दिवस सुरळीत संसार सुरू होता.निकालानुसार मुलगी पत्नीकडे असणार आहे.
वैचारिक मतभेदामुळे नोव्हेंबर २०२२ वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
– ॲड. कुमार माळवदकर, ॲड. नंदकिशोर येरंडे, अर्जदारांचे वकील





