Pune News : पेरीविंकल शाळेचा इ.10वी त देखील 100% निकालाचा डंका कायम !

Pune News : चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस, बावधन व पिरंगुट या तिन्ही शाखेचा शै.वर्ष 2024-25 बॅच चा इयत्ता 10वी चा निकाल 100% लागला असून 10वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील वर्षाप्रमाणेच 100% निकालाची परंपरा कायम ठेवून बाजी मारली आहे.
यंदाच्या 10वी च्या परीक्षेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बावधन येथून एकूण 105, पिरंगुट येथून 125 तर सुस येथून 86 असे एकूण 300 हून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून सूस शाखेतील शौर्य कवडे याने ने 96.40% मिळवून संपूर्ण शाळेत प्रथम स्थान पटकवून बाजी मारून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच कविता इंदा हिला 95.20% गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त झाले तर तन्मय साळुंखे याने 90.20%गुण पटकवून तिसरे स्थान पटकवले आहे.
तसेच बावधन शाखेतून तन्वी बालपत्की हीने 94% मिळवून बावधन शाखेत प्रथम येण्याचा मान पटकवला आहे तर प्रज्वल कविटके याला 93.40% गुण मिळून द्वितीय स्थान प्राप्त झाले असून क्रांती लोळे हिला 90.% गुण असून तृतीय स्थान प्राप्त झाले आहे.
बावधन शाखेतून प्रज्वल कविटके याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून उच्चांक गाठला आहे.
तसेच पिरंगूट शाखेतून श्रुती जावळे हीने 94.80% गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले. तर कार्तिकी सातव हीने 90.00% गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवला असून अथर्व पाटील याने 88.40% गुण मिळवून तृतीय स्थान पटकवून बाजी मारली आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण होवून विद्यालयातील सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा व त्यांना तशीच सार्थ साथ देणारे सर्वच विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या परिश्रमाचे चीज म्हणजेच आजचा हा 100% निकाल होय असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी केले.
या निकालामागे शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वाना कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, तसेच संचालिका रेखा बांदल व शिवानी बांदल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व तसेच पर्यवेक्षिका स्मिता श्रीवास्तव, सचिन खोडके, पूनम पांढरे, कल्याणी शेळके, नेहा मालवदे , तसेच वर्गशिक्षक रेश्मा भोसले, योगिता धाने व स्वाती कोल्हे व विद्या झोपे व सर्व विषयशिक्षक या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद , तसेच या सर्व वातावरणात आपले १००% प्रयत्न देणारे विद्यार्थी या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नानेच हे यश प्राप्त करू शकल्याची दिलखुलास शाबासकीची थाप सर्वांनी दिली.
आजच्या या उत्तुंग यशाचे मानकरी असलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांचा पुष्पगुछ व पेढे देऊन शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या भावी उच्च शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ऑनलाईन निकाल लागल्यावर लगेचच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक साजरे करण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष जातीने उपस्थित राहिले.





