Pune News : वाघोली-भावडी रोड येथे ऑफरोड चॅलेंज शर्यतीचे आयोजन; प्रदीप कंद यांच्या हस्ते उद्घाटन

वाघोली (प्रतिनिधी) : सहयाद्री ऑफ रोड ट्रस्ट तर्फे वाघोली-भावडी रोडवर खाण परिसरामध्ये सहयाद्री ऑफरोड चॅलेंज चॅप्टर ४ शर्यतीचे आयोजन १२ ते १४ जुलै दरम्यान करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या शर्यतीमध्ये महाराष्ट्रासह देशभरातून येणारे शंभरहून अधिक ऑफरोड चॅम्पियन ड्रायव्हरचे कौशल्य पहावयास मिळणार आहे.
याचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सह्याद्री ऑफ रोड ट्रस्ट संस्थेचे प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
सहयाद्री ऑफ रोड ट्रस्ट संस्था मागील ४ वर्षापासून ऑफरोडींग प्रकारचे वाहनांची शर्यत घेत आहे. साहसी खेळ, अडथळ्याची तसेच अवघड जागेत वाहन चालवणे आणि शर्यत जिंकण्याचे थरार या माध्यमातून पहावयास मिळणार आहे.
आपल्या नेहमीच्या वापरातील ४ बाय ४ च्या जीप किंवा तत्सम चारचाकी गाड्या या स्पर्धेसाठी विशेष पद्धतीने मॉडीफाय केलेल्या गाड्यांचा व चालकांचा कस खडतर मार्गावर लागणार आहे.





