Pune News : भारती विद्यापीठाच्या ‘जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन’च्या एनएसएस स्वयंसेवकांकडून तळजाईवर वृक्षारोपण
भारती विद्यापीठाच्या (Pune News) जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य ऋषिकेश देशमुख सर, उपप्राचार्य अमित पाटील सर यांच्या प्रोत्साहना मुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांद्वारे शनिवार दिनांक ११ जुलै २०२६ रोजी " तळजाई वन उद्यान " ला जावून पर्यावरण जनजागृती बदल माहिती घेऊन वृक्षारोपण केले.

Pune News : भारती विद्यापीठाच्या (Pune News) जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य ऋषिकेश देशमुख सर, उपप्राचार्य अमित पाटील सर यांच्या प्रोत्साहना मुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांद्वारे शनिवार दिनांक ११ जुलै २०२६ रोजी ” तळजाई वन उद्यान ” ला जावून पर्यावरण जनजागृती बदल माहिती घेऊन वृक्षारोपण केले.
आज जागतिक तापमानात (Pune News) ऐवढी वाढ झाली आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. ओझोन वायूचा थर कमी होत आहे, जंगलांची होणारी बेसुमार तोड तसेच त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अनेक जाती नष्ट होत आहेत. एकंदर पर्यावरणाचा पूर्ण समतोलच नष्ट होत चालला आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी आपले जीवन शाश्वत ठेवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे या विषयी , मा. अनिल सर यांनी मार्गदर्शन केले. यामुळे आमच्या सर्व स्वयंसेवकांना निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दल नवीन दृष्टीकोन मिळाला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक नियोजित या कार्यक्रमास ३५ स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. विद्या खोबरे ,प्रा. जागृती कडू, व उपप्राचार्य अमित पाटील सर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला प्रा. उमेश सैंदाणे सरांचे सहकार्य मिळाले.






