Pune News : नीलकंठ ज्वेलर्सला रिटेल ज्वेलर इंडिया अवॉर्ड्स 2025 मध्ये मिळाला ‘बेस्ट ब्रायडल ज्वेलरी’चा मान

पुणे : पुण्यातील नीलकंठ ज्वेलर्सने आपल्या अप्रतिम कारागिरी आणि सौंदर्यपूर्ण डिझाइनसाठी पुन्हा एकदा देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. रिटेल ज्वेलर इंडिया अवॉर्ड्स २०२५ मध्ये नीलकंठ ज्वेलर्सने “बेस्ट ब्रायडल प्रेशियस कलर्ड जेमस्टोन ज्वेलरी ऑफ द इयर” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. हा सन्मान त्यांनी रुबी आणि डायमंडने सजवलेल्या, पेस्ली डिझाइनवर आधारित एका अनन्यसाधारण हारासाठी मिळवला आहे.
या पुरस्कारप्राप्त हाराची रचना पारंपरिक पेस्ली नमुन्याला आधुनिक सौंदर्यशास्त्राची जोड देणारी आहे. लाल रंगाच्या रुबींची समृद्ध चमक आणि हिर्यांचा चकाकता यांचा सुंदर मिलाफ या हारात दिसून येतो, ज्यामुळे तो वधूसाठी अत्यंत आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. नीलकंठ ज्वेलर्सच्या कारागीर आणि डिझाइनरांच्या चमूने परंपरा, सौंदर्य आणि उच्च दर्जाच्या रत्नांचा समन्वय साधत हा उत्कृष्ट दागिना साकारला आहे. या हाराच्या नाजूक वळणांमधून त्यांची कलात्मकता आणि तांत्रिक कौशल्य यांचा प्रत्यय येतो.
रिटेल ज्वेलर इंडिया अवॉर्ड्स हे दागिन्यांच्या क्षेत्रातील सर्वात मानाचे पुरस्कार मानले जातात. देशभरातील अनेक नामांकित ब्रँड्समधून नीलकंठ ज्वेलर्सने हा पुरस्कार जिंकणे, ही पुणे शहरासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. या यशामुळे नीलकंठ ज्वेलर्सच्या कलाकुसरीला आणि नावीन्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
या यशाबद्दल नीलकंठ ज्वेलर्सच्या संपूर्ण चमूने आपल्या ग्राहकांचे आणि समर्थकांचे आभार मानले आहेत. “हा पुरस्कार आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा सन्मान आहे. भविष्यात आम्ही आणखी नावीन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण वधू दागिने सादर करत राहू,” असे आश्वासन नीलकंठ ज्वेलर्सच्या चमूने दिले आहे. या यशामुळे त्यांचे ग्राहक आणि दागिन्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नीलकंठ ज्वेलर्सने यापूर्वीही आपल्या उत्कृष्ट डिझाइन आणि दर्जेदार कारागिरीसाठी नावलौकिक मिळवला आहे. या पुरस्काराने त्यांच्या या प्रवासाला आणखी बळ मिळाले असून, ते भविष्यातही अशाच प्रकारे नावीन्यपूर्ण दागिन्यांच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.





