pune news : लाडू-चिवडा उपक्रम हा आदर्श

पोलीस आयुक्त अमितेश कुमार : दि पुना मर्चंट्स चेंबरच्या उपक्रमाचे उद्घाटन
पुणे – दर्जेदार लाडू-चिवडा सर्वांना योग्य दरात मिळून सगळ्यांचीच दिवाळी गोड व्हावी, या हेतूने दि पूना मर्चटस् चेंबरने राबवलेला उपक्रम सामाजिक उत्तरदायीत्वाचे आदर्श उदाहरण असल्याचे मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
दि पूना मर्चटस् चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. यावेळी दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.
राजेंद्र बाठिया म्हणाले की, या उपक्रमाने देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत.
यावेळी विविध सामाजिक संस्था तसेच सीमेवरील जवानांसाठी दोन हजार किलो देण्यात आला. तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा यांना डी.लिट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा अमितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार केला. ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल मणियार, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक,
निकीता बाठिया, पप्पू महाराज आणि ताराचंद महाराज, सिद्धार्थ हॉस्पीटलचे डॉ. विजय सेठिया फूड कन्सल्टंट सोनाली पवार, अमितेशकुमार सुकडे यांचाही सहकार्याबद्दल सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले. चेंबरचे सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले.





