pune news : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत दीडशे महिलांचा पक्षप्रवेश

वाघोली (प्रतिनिधी) – हवेली व भोसरी मधील जवळपास दीडशे महिला पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्यात आला असल्याची माहिती शिरूर लोकसभा महिला संपर्कप्रमुख डॉ. सारिका किरण पवार यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात डॉ. सारिका किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश तसेच महिला संघटनात्मक बाजू बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून,
याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीडशे महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
विविध पक्षांतील अनेक महिला कार्यकर्त्या शिवसेना पक्षात प्रवेश करू इच्छित असून त्यांच्या पक्षप्रवेशाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत असून आगामी काळात हे पक्ष प्रवेश जास्तीत जास्त करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.





