पुणे – राहत्या घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी लोणीकाळभोर येथील वडाळे वस्ती येथे घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास हाती घेताच तीन तासांतच आरोपींचा माग लागला. हा खून मृत व्यक्तीच्या पत्नीने अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले. या दोघांनाही लोणीकाळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविंद्र काशीनाथ काळभोर (४५,रा. वडाळे वस्ती, लोणी काळभोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शोभा रविंद्र काळभोर (४२) आणि गोरख त्र्यंबक काळभोर (४१) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सकाळी साडेसातच्या सुमारा नियंत्रण कक्षास कॉल मिळाला की, रायवाडी रोड, वडाळे वस्ती याठिकाणी एक एक व्यक्ती जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला आहे. पथक घटनास्थली पोहोचताच रविंद्र काळभोर काळभोर हा त्याचे राहते घराचे बाहेर पलंगावर रक्ताचे थारोळयात पडला असल्याचे दिसुन आले. पोलिसांती तातडीने आय कार, डॉग स्कॉड व रुग्णवाहिकेला पाचारण केले. वैद्यकीय तज्ञांनी त्यास मृत घोषीत केले. तपास पथकाने आजबाजुचे परिसरातील लोकांकडे आणि परिस्थीतीजन्य पुराव्यांचे आधारे चौकशी करुन माहिती घेतली. त्यावर मृताची पत्नी शोभा हीचे गोरख यांचेशी अनैतीक संबध असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्या दोघांनाही ताब्यात घेवुन चौकशी केली असता, दोघांनी आपसांत संगणमत करुन त्यांचे अनैतीक संबंधास बाधा निर्माण होत असल्याने खून केल्याचे सांगितले. त्यांनी रविंद्रच्या डोक्यात खोऱ्याचे लाकडी दांडक्याने वार करुन, गंभीर जखमी करुन, ठार मारले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.