Pune News : ऑनलाइन मैत्री करून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळी अटक

पुणे – ऑन लाईन मैत्री आणि तिही नको त्या संबंधात असेत तर लूटले गेल्यानंतरही व्यक्ती कोठेही तक्रार करत नाही. ही बाब हेरु आत्तापर्यंत पन्नास पेक्षा जास्त जणांना आपल्या जाळ्यात खेचणाऱ्या एका टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांनी ‘ गे-डेटींग अॅप’वरुन शहरात धुमाकूळ घातला होता. यामुळे लूटले गेल्यानंतरही आपली ओळख पटू नये तसेच बदनामिच्या भितीने पिडीत तक्रार देत नव्हते. मात्र एका तरुणाने धाडस दाखवत केलेल्या तक्रारीमुळे या टोळीचे बिंग फिटले आहे.
वाजीद रज्जाक उर्फ लालसाहब शेख (१९ ), महेबुब ऊर्फ गौस जावेद शेख (२० ),श्रीनिवास उर्फ शिनु व्यकप्पा नायक (२२), सोहेल गफुर शेख (२४, सर्व रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत.
… अशी केली होती लूटमार
गे डेटींग अॅपवरून झालेल्या ओळखीतून पिंपरी परिसरात राहणार्या एका तरुणाला चौघांनी मारहाण करत लुटले होते. ही घटना १८ मार्च रोजी मंगळवार पेठेतील आरटीओ चौक परिसरातील मोकळ्या जागेत घडली होती.
आरोपींनी तरुणाला धमकावून मारहाण करत त्याच्याकडील डेबीट कार्ड, मोबाईल आणि गाडीची चावी काढून घेतली. त्यानंतर डेबीट कार्डचा पिन क्रमांक घेऊन एटीएमधून ९ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर चौघा आरोपींनी परत तरुणाला लाकडी फांदी आणि हाताने बेदम मारहाण केली होती.
अशा ठोकल्या बेड्या..
आरोपींनी फिर्यादी तरुणाचा मोबाईल देखील फॉरमॅट केला होता. त्यामुळे अॅपद्वारे संपर्क केलेली माहिती डिलीट झाली होती. शाहरुख टॉप नाव हाच काय तपासाचा दुआ पोलिसांंकडे होता.
पोलिस उपनिरीक्षक मोहन काळे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, प्रदिप शितोळे, सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांनी त्यांचा मोर्चा मंगळवार पेठेकडे वळविला होता.
त्यावेळी त्यांना महेबुब याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने तिघा साथीदारांबरोबर असे गुन्हे केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या पथकाने केली.
अशी आहे मोडस ऑपरेंडी..
चौघे आरोपी एकाच लुटारु टोळीचे सदस्य आहेत. मात्र त्यातील महेबुब आणि सोहेल हे दोघे प्रमुख सुत्रधार आहेत. महेबुब याच्या मोबाईलमध्ये त्या अॅपवर शाहरूख टॉप नावाने खाते तयार करण्यात आले आहे. त्यावर फोटो देखील महेबुबचा आहे.
मात्र समोरच्या व्यक्तीशी चॅटींग सोहेल करतो. अॅपच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर सावज हेरतात. सावजाला प्रथम महेबुब भेटतो. तो भेटत असताना काही वेळानंतर वाहीद,श्रीनिवास आणि सोहेल येतात. सावज आणि महेबुब या दोघांना ते धमकावतात.
त्याचवेळी महेबुब तेथून पळ काढल्याचे नाटक करतो . इतर तिघे सावज तरुणाला ब्लॅकमेल करून आम्ही तुझे व्हिडीओ तयार केले आहेत. फोटो काढले आहेत असे सांगून ब्लॅकमेल करतात.
पैसे देण्यास नकार दिला तर मारहाण करु लुटतात. त्यानंतर काही वेळातच महेबुब देखील त्या तिघांना सामिल होते. आत्तापर्यंत या टोळीने पन्नास पेक्षा अधिक जणांना अशाप्रकारे लुटल्याचा अंदाज आहे.





