Pune News : मित्राच्या खून प्रकणातून पाच जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता

पुणे : आरोपीने केलेल्या हल्ल्यामुळे मयत व्यक्तीचा मृत्य झाला, असा कोणताही पुराव्यातून सिध्द होऊ न शकल्याने खून प्रकरणी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा व सत्र न्यायधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला.
धीरज गवळी, राजेश स्वामी, सागर उंबरकर, राधा स्वामी व रेणुका परदेशी अशी त्या पाच जणांची नावे आहेत. यातील धीरज गवळी तर्फे ॲड. प्रणित नामदे व ॲड. अजित पवार यांनी काम पाहिले. तर उर्वरित आरोपींतर्फे ॲड. सचिन स्वामी यांनी काम पाहिले.
गोपाल कांबळे असे खून झालेल्यांचे नाव आहे. १४ मार्च २०२९ रोजी खडकी येथे निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्याची आजी भारती मोरे यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे पाच आरोपीविरुद्ध तक्रार दिली होती.
या प्रकरणातील संशयित आरोपी धीरज गवळी तसेच त्याचे इतर चार साथीदार यांच्या विरुद्ध सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते. धीरज गवळी यांच्या वाढदिवसाच्या पार्टी साठी मयत व्यक्तीस आरोपी बोलावत होते.
त्यावेळी फिर्यादी यांनी जाण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे तो वाढदिवसाला गेला नाही. तसेच, पूर्वीच्या वैमनस्यातून त्याच्यावर पूर्वनियोजित कट रचून धारदार शस्त्र वापरून हा खून करण्यात आला होता.
खुनाच्या प्रकरणात कुठलाही महत्वाचा पुरावा न्यायालयात सिध्द होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने पाच जणांची मुक्तता केली.





