pune news : सहकारी संस्थांची निवडणूक; मतदार यादी तयारीच्या सूचना

Updated On:
pune news : सहकारी संस्थांची निवडणूक; मतदार यादी तयारीच्या सूचना

पुणे- विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या राज्यातील २९ हजार ४२९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. संबंधित सहकारी संस्थांना मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना प्राधिकरणाने दिल्या असून दि. ३१ डिसेंबरपर्यंत मतदार याद्या आलेल्या संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे राज्यातील अ वर्गातील ४२, ब वर्गातील १,७१६, क वर्गातील १२,२५० आणि ड वर्गातील १५,४३५ अशा एकूण २९ हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ७,१०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

त्यानुसार २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने सहकारी सस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सूचना केल्या आहेत, अशा संस्थांची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड केली आहे किंंवा नाही, याबाबत संबंधित संस्थांकडून माहिती मागविण्यात येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

2026-10-07 16:58:14

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक