Pune News | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वेळेत बदल ; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषणसंबंधी नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केला आहे. यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे असून, सोमवार दि.1 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी दिली होती.
मात्र, त्यात बदल करत आता रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या 18 ऑगस्टच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता मंगळवार दि. २ सप्टेंबर ते शुक्रवार (दि. ५) शनिवार (दि. ६) या दिवशी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.





