pune news : केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी १० डिसेंबरला हाती

पुणे – पालिका निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून १० डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
पालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ ची विधानसभानिहाय मतदार यादी ग्राह्य असणार आहे. प्रारूप मतदार यादी मंगळवारी, आज आयोगाच्या वेबसाईटवर डाऊनलोड झाल्यावर ६ नोव्हेंबरपासून हरकती व सूचना दाखल करता येतील.
१४ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून २८ नोव्हेंबरपर्यंत हरकती-सूचनांवर निर्णय होऊन प्रभागनिहाय अंतीम मतदार याद्या प्रसिध्द होतील. ४ डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी जाहीर करावी लागणार आहे. १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
आयोगाने पुणे महापालिकेसह सर्व महापालिकांना मतदार याद्या तयार करताना दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदारांची नोंद वगळण्याच्या तसेच याद्यांतील चुका टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची औपचारिक तयारी सुरू झाली असून, डिसेंबर अखेर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.





