Pune News : ब्रँडेडची जाहिरात, बनावटची विक्री..; पोलिसांकडून ४० हजारांचा माल जप्त

पुणे – नोव्हेटल या तारांकीत हॉटेलमध्ये लागलेल्या ब्रँडेड कपड्यांच्या सेलची जाहीरात मागील काही दिवस समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात फिरत होती.
मात्र येथील ब्रँडेड कपडे हे बनावट असल्याची तक्रार प्राप्त होताच येरवडा पोलिसांनी छापा टाकून ४० हजाराचा माल जप्त केला आहे. स्वामित्व हक्काचा भंग केल्याप्रकरणी अंकीथ राजेंद्र अगरवाल (रा.बंगलोर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महेंद्र सोहम सिंग (३८, कसबा पेठ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादीकडे काही कंपण्यांचे स्वामित्व हक्क संदर्भात अधिकारी आहे.
त्यांना कळाले होती की, नोव्हेटलमध्ये एक सेल लागला असून तेथे स्वामित्व असलेल्या वेगवेगळ्या कंपण्यांचे बनावट टी शर्ट, जॅकेटस , ट्रॅकपँट, सॉक्स विक्रसाठी उपलब्ध आहेत.
त्यांनी तेथे खात्री केल्यानंतर पोलिसांसह छापा टाकला. तेथून ४० हजाराचा बनावट माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सोळुखे करत आहेत.





