pune news : शिवजीनगर न्यायालयाच्या आवारातील गोळीबार प्रकरणात एकास जामीन
Updated On:

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात साक्षीदारावर गोळीबार केल्याप्रकरणी रोहन चंदेलिया उर्फ छोटा रावण याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयाने मंजूर केला.
त्याने ऍड. अमित यादव , ऍड प्रीया मुळे यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्याला 7 मार्च 2019 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात 13 मार्च रोजी अटक केली होती. त्याने गुन्हा केला नाही. सहाअरोपीला जामीन झाल आहे.
अर्जदाराची भूमिका आणि तो अधिक काळ तुरुंगात असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन व गोळीबार केल्यानंतर घटनास्थळी पुंगळ्या व गोळ्या आढळून आल्या नाहीत.
फिर्यादीने दिलेल्या दोन जबाबात विसंगती असल्याचा युक्तिवाद ऍड. अमित यादव यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन मंजूर केला. ही घटना शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात घडली होती.





