Pune News : “चित्रकलेच्या प्रसारासह कला साक्षरताही आवश्यक” – रामदास फुटाणे

पुणे – चित्रकला ही प्राचीन काळापासून मानवाची संवाद भाषा असून आजच्या मोबाईल युगात कलेचा प्रसार झपाट्याने होताना दिसतो आहे. परंतू कला रसिकांसह सामान्य नागरिकांमध्ये कला साक्षरता होणे सुद्धा गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ कवी, कला समिक्षक व सिने दिग्दर्शकरामदास फुटाणे यांनी केले. बालगंधर्व कलादालन पूणे, येथे आयोजित जामखेड येथिल कलाशिक्षक मुकुंद राऊत यांच्या मॉडर्न आर्ट (abstract पेटिंग) विषयक चित्र शिल्प प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ल.ना.होशिंग विद्यालयातील कलाशिक्षक राऊत मुकुंद यांच्या चित्र-शिल्पाचे प्रदर्शन 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व कलादालन पुणे या ठिकाणी संपन्न झाले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ साहित्यिक वात्रटिकाकार रामदासजी फुटाणे, पद्मश्री पोपटराव पवारआदर्श ग्राम समिती कार्याध्यक्ष हिवरे बाजार, आंतरराष्ट्रीय चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे, शिवाजीराव बोडके (IPS) माझी पोलीस महानिरीक्षक, शिक्षणतज्ञ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते अ.ल.देशमुख, प्राचार्य बाळासाहेब पारखे ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड, सदानंद होशिंग माजी सुभेदार भारतीय सैन्य, व्यंगचित्रकार लहू काळे पुणे,संजय पठाडे जिल्हाध्यक्ष कला शिक्षक संघटना अ.नगर. सर्व मान्यवरांचे सत्कार व त्यानंतर राऊत मुकुंद यांचे कॅटलॉग पुस्तिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी राजेश मोरे खजिनदार दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड, प्राचार्य रमेश अडसूळ, माझी उपमुख्याध्यापक दादाहरी ठाकरे सर, माझी प्राचार्य हलकुडे, हळपावत, शहाजी वायकर, कलाशिक्षण रघुनाथ हराळे उपमुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, सिने निर्माते रंजीत गुगळे, ऋषिकेश हुंबे, डॉक्टर पल्लवी वायकर डॉक्टर अश्विनी शेंडे, कलाशिक्षक सरसमकर, गोलेकर, चित्रकार गजानन शेळके, डॉक्टर स्नेहल पाटील, अनेक माझे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉक्टर प्रवीण बनकर यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, आदर्श गाव समिती अध्यअ, महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कला शिल्पकार प्रमोद कांबळे, याच्यासह अ ल देशमुख, सदानंद होशिंग, बाळासाहेब पारखे, लहू काळे, संजय पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते, याप्रसंगी, मान्यवरांनी राऊत यांच्या चित्रकला प्रसाराबाबत विशेष कौतुक करत सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकत राऊत यांनी कलाजीवनाचा प्रवास उलगडत ल. ना. होशिंग विदयालय जामखेड यांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद व संचालक मंडळ यासह माजी विद्यार्थी याचे आभार मानले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने राऊत यांचे आईवडील घनश्याम व सी.शांताबाई राऊत यांचा मान्यवरांच्या शुभहस्तते नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे मराठी विभाग प्रमुख आणि आभार प्रदर्शन डॉ प्रवीण बनकर यांनी केले.





