पुणे : रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता; संतप्त नागरिकांनी अडवला आमदारांच्या गाड्यांचा ताफा

Updated On:

विश्रांतवाडी – लोहगाव येथील निरगुडी रस्त्यावरून खंडोबा माळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्‍न पडावा, अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे.

या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींबाबत संताप आहे. अशातच खंडोबामाळ याठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी रविवारी (दि.५) आमदार सुनील टिंगरे याच रस्त्यावरून जात असताना संतप्त नागरिकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवत घेराव घातला. या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आगामी निवडणूक लढवण्यास इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना देखील संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

जिथे जनता परेशान आहे तिथे मतांची अपेक्षा करू नका, असे खडे बोल सुनावले.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या ह्ददीपर्यंतच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीवाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागते. तसेच पादचाऱ्यांची तर चांगलीच तारांबळ होते. हा रस्ता चालण्यायोग्य बनवावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.

या परिसरात साधारण आठशे-नऊशे घरं आहेत. म्हणजे दोन ते अडीच हजार लोकवस्ती आहे. या रस्त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांचे, गरोदर महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे फार हाल होतात. खड्ड्यात नागरिक रोज पडतात. आजारी रूग्ण, वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी यांना सोडण्यासाठी रिक्षा येत नाही. याबाबत आमदारांसमोर गाऱ्हाणे मांडताना अक्षरशः महिलांना अश्रू अनावर झाले. पक्का रस्ता करायचा तेव्हा करा, सध्या मुरूम टाकून खड्डे बुजवावेत एवढीच माफक अपेक्षा रहिवाशांनी आमदार व स्थानिक इच्छुकांकडे केली. बराच वेळ आमदार गाडीत बसून होते. यावेळी अशोकबापू खांदवे, राजेंद्र खांदवे, बंडू खांदवे, नवनाथ मोझे, मिलिंद खांदवे, मोहन मोझे यांनी खंडोबा माळ परिसरातील संतप्त रहिवाशांना मध्यस्थी करत शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांचा संताप वाढत होता. शेवटी आमदारांनी गाडीतुन खाली उतरून चर्चा केल्यानंतर नागरिकांचे काही प्रमाणात समाधान झाले. यावेळी आमदार टिंगरे यांनी संतप्त नागरिकांशी बातचीत केली. ते म्हणाले शांतपणे चर्चा केल्याने मार्ग निघतात. लोहगावचा महापालिकेत समावेश झाला असला तरी स्थानिक नगरसेवक नसल्याने मार्गी लागत नाहीत. येथील स्थानिक नगरसेवक झाल्यानंतर समस्या मार्गी लागतील असे सांगितले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुरूम टाकून खड्डे बुजविले जातील असे आश्वसन दिले.

याबाबत प्रतिक्रीया देताना आमदार सुनील टिंगरे म्हणाले की, खंडोबामाळकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. हा रस्ता करण्यासाठी यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी देखील प्रयत्न केले आहेत. पालिकेकडून मोबदला मिळाला नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा रस्ता करण्यास विरोध आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लोहगावचा विकास आराखडा (डीपी) मंजूर नसल्याने शेती झोननुसार मोबदला देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र नुकसान होत असल्याने शेती झोननुसार मोबदला घेण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे रस्ता करण्यास अडथळा येत आहे. याठिकाणच्या रहिवाशांची अडचण दूर करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे आमदार सुनील टिंगरे म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

2026-08-22 20:33:14

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

Devendra Fadnavis : वंदे मातरमबाबत काँग्रेसची भूमिका मानसिक गुलामगिरीची; देवेंद्र फडणवीस यांची टीका

2026-08-20 17:43:38

Devendra Fadnavis : वंदे मातरमबाबत काँग्रेसची भूमिका मानसिक गुलामगिरीची; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Pune News : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मारुती शिंदे, सरचिटणीसपदी महेश घुले बिनविरोध

2026-08-19 21:24:45

Pune News : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मारुती शिंदे, सरचिटणीसपदी महेश घुले बिनविरोध

FDA Fine : हायकोर्टाचा 'एफडीए'ला मोठा झटका; पुण्यातील मिठाईच्या दुकानाला 5 लाखांची भरपाई देण्याचे आदेश; वाचा काय आहे प्रकरण

2026-08-17 18:57:25

FDA Fine : हायकोर्टाचा 'एफडीए'ला मोठा झटका; पुण्यातील मिठाईच्या दुकानाला 5 लाखांची भरपाई देण्याचे आदेश; वाचा काय आहे प्रकरण

Pune News : एमआयटी एडीटी' विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

2026-08-15 18:28:30

Pune News : एमआयटी एडीटी' विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा