Pune News : नांदेड सिटी वारी समितीच्या माध्यमातून ‘भक्ती आणि सामाजिक भान’ यांचा त्रिवेणी संगम.!
नांदेड सिटी वारी समितीच्या माध्यमातून व अविनाश लगड युथ फाउंडेशनच्या सहभागाने आयोजित पुणे - सासवड पायी वारी (वर्ष १२ वे) सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

Pune News : नांदेड सिटी वारी समितीच्या माध्यमातून व अविनाश लगड युथ फाउंडेशनच्या सहभागाने आयोजित पुणे – सासवड पायी वारी (वर्ष १२ वे) सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
या वारीचे यंदाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे युथ फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी लहान मुलांवरील अत्याचारांविषयी पोस्टरद्वारे जनजागृती करण्याचा एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक उपक्रम राबवला. या सोहळ्यात जवळपास २५५ माऊलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मंतरवाडी ते सासवड असे २६ किलोमीटर अंतर पायी चालून वारीचा अद्भूत आनंद घेतला.
वारीचे शिस्तबद्ध आणि चोख नियोजन करणाऱ्या नियोजन समितीचे सदस्य अविनाश लगड, संजीव बिजमवार, किरण भणगे, राहुल सोमवंशी, निलेश हगवणे, सचिन रसाळ, ज्ञानेश्वर सोळसकर, नितीन कुलकर्णी, सूर्यकांत कदम, प्रसाद ढेकळे, नितीन देशमुख, प्रशांत उगले, विशाल अमृतकर आणि नितीन मायने, प्रकाश पुणेकर यांचे मनापासून आभार व कौतुक.





