PUNE: होळकरवाडीत राष्ट्रवादीचा गावभेट दाैरा; नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपक्रम

होळकरवाडी : गावभेट दौरा कार्यक्रमात सुरेश घुले, दिंगबर दुर्गाडे यांना निवेदन देताना नागरिक.
फुरसुंगी – हवेली तालुक्यातील प्रत्येक गावाला भेट देऊन त्या भागातील नागरी समस्या व नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटीबध्द आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत भाडळे यांनी दिली.
हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) आयोजित गाव भेट दौराच्या आयोजन हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत भाडळे यांच्या मार्गदर्शनानुसार हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेश झांबरे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली होळकरवाडी येथे सदर कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी नागरिकांनी गाव भेठी दरम्यान अनेक प्राथमिक समस्या मांडल्या त्यांच्या भावना समजून रस्ता, वीज, पाणी समस्येवर योग्य तोडगा लवकरात लवकर संबंधित प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून समस्या सोडवू, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रजीत हरपळे, प्राचीताई देशमुख, भगवान भाडळे, प्रकाश हरपळे, विश्र्वास झांबरे, गुरुदत्त राऊत, महेश सूळ, उत्तमभाऊ गायकवाड, महेंद्र चौरे, सुभाष थिटे, दत्ताभाऊ होळकर, नानासाहेब झांबरे सर, ईश्वर झांबरे, दादासाहेब पठारे, संतोष हिंगे आदी उपस्थित होते.




