Pune–Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेसाठी संगमनेर येथे जागरण-गोंधळ आंदोलन
पुणे–नाशिक थेट रेल्वे (Pune–Nashik Railway) प्रकल्पाच्या मागणीसाठी देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीच्या वतीने संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.

Pune–Nashik Railway : पुणे–नाशिक थेट रेल्वे (Pune–Nashik Railway) प्रकल्पाच्या मागणीसाठी देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीच्या वतीने संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.
पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाचा (Pune–Nashik Railway) अभ्यास करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आलेले ६० दिवस आज पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर समितीला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. समितीने केलेल्या अभ्यासातून सकारात्मक दिशा मिळावी आणि शासनाने पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत पुढील ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील जागरण-गोंधळाच्या माध्यमातून कुलदैवत खंडोबा, भैरोबा आणि अंबाबाईच्या चरणी पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प लवकर मार्गी लागावा, अशी प्रार्थना करण्यात आली. हे आंदोलन पक्षीय राजकारणापासून दूर ठेवून जनतेच्या विकासाच्या प्रश्नासाठी करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–जुन्नर–नारायणगाव–मंचर–चाकण–पुणे या प्रस्तावित मार्गाचा पुनरुच्चार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तयार करण्यात आलेले सविस्तर निवेदन शासनापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया करण्यात आली.
आंदोलनात (Pune–Nashik Railway) देवगाव ग्रामस्थ, रेल्वे समर्थक आणि नागरिक सहभागी झाले होते. मधुसूदन शिंदे, रविंद्र लामखडे, कोमल म्हस्के, शंकर पावसे, शिबा गायकवाड, दत्ता ढगे, सागर कोल्हाळ, संजय देशमुख, संतोष शिंदे,मुकुंद शिंदे,तुषार पानसरे आणि किरण देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, विनय सावंत, राजाभाऊ अवसक, इंजिनियर संतोष फापाळे, गणपत लामखडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नायब तहसीलदार माळवे यांच्या कडे निवेदन देण्यात आले.





