Pune Mumbai Highway Accident : पुणे-मुंबई हायवेवर काळजाचा थरकाप! कारच्या भीषण अपघातात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
Pune Mumbai Highway Accident : अपघातातील मृताच्या पश्चात हळहळ; महामार्गावरील वाढत्या वेगामुळे पुन्हा एकदा निष्पाप जिवाचा बळी.
Updated On:

Pune Mumbai Highway Accident – चालकाच्या निष्काळजीपणामुळे कारने पुढच्या वाहनाला आणि दुभाजकाला धडक दिल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. ८) रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई हायवेवर शिरगाव हद्दीत घडला. याप्रकरणी अश्वेश राजेश सावंत (३२, विरार वेस्ट, मुंबई) यांनी बुधवारी (दि. ८) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आदित्य उदय शहा (वय ३०, रा. विटा, जि. सांगली) या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात दर्शन अभिजित शहा (वय १५, रा. कडेगाव, जि. सांगली) या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा आपली कार (एमएच १० ईके ३६५१) वेगाने घेऊन जात असताना त्याचे रस्त्यावरील लक्ष विचलित झाले आणि कारने समोरच्या अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.
त्यानंतर कार उजव्या बाजूच्या दुभाजकाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात दर्शन याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर फिर्यादी आणि आरोपी देखील जखमी झाले आहेत. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





