Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार
Updated On:

पुणे : ससून रुग्णालयात मुलाला जन्म दिल्यानंतर आई पसार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित १८ वर्षीय तरुणीवर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ मार्च २०२५ ला घडली असून, २२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आम्रपाली आलटे समाजसेविका असून, बेवारस नवजात मुलांसाठी काम करतात. आरोपी तरुणीने १७ मार्चला ससून रुग्णालयात मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी तिने ससून रुग्णालयातून पलायन केले.
मुलाच्या संगोपनाची जबाबदारी टाळल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत.





