Pune News : तिढा सुटला! विधान परिषदेची पुण्याची जागा राष्ट्रवादीच लढवणार; महायुतीचा सस्पेन्स संपला
Pune News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाबाबत अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Pune News : विधानपरिषदेची पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार हे निश्चित झाले असून, या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्याला काही तासच शिल्लक आहेत, त्यामुळे रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी ऐनवेळी उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. Pune News()
पुण्यातील जागेसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असून देखील ही जागा भाजपच्या पारड्यात जाईल का, याबाबत चर्चा सुरू होती. (Pune News)
यावर मुंबईत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार होता.अखेर रविवारी मुंबई येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटला. त्यात ही जागा राष्ट्रवादीकडे गेली.
पुणे शहरातून माजी आमदार सुनील टिंगरे, माजी शहराध्यक्ष दीपक मानकर, नगरसेवक अमोल बालवकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड मधून माजी आमदार विलास लांडे, संदीप वाघेरे, नाना काटे हे इच्छुक आहेत. (Pune News)
याशिवाय जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह माजी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांची नावे देखील चर्चेत आहेत. (Pune News)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून यापूर्वीच शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना या जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार हे निश्चित. (Pune News)





