पुण्यातील लघुशंका प्रकरण: गौरव आहुजाचा मुक्काम तुरुंगातच; भाग्येश ओसवालला सशर्त जामीन मंजूर

Gaurav Ahuja Bhagesh Oswal | जागतिक महिला दिनादिवशी पुण्यातील येरवडा भागातील एका चौकात अलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका केल्याचा घृणास्पद प्रकार घडला होता. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना अटक केली होती. यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. या प्रकरणात आरोपी गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवाल याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस बारी यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. तर गौरव आहुजाचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
या प्रकरणातील आरोपी गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल या दोघांनाही न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. या प्रकरणात भाग्येश याचा सहभाग अत्यल्प असल्याचा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी न्यायालयात होता. त्यानुसार त्याला ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटी शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा (वय 25) या तरूणाने भर चौकात कार थांबवून लघुशंका केली होती. तसेच अश्लील कृत्य केले होते. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
आरोपी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवालने जामीन अर्ज केला होता. मात्र, गौरव आहुजा याने केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी येरवडा पोलिसांनी मुदतवाढीची मागणी केली. त्यानुसार आता गौरव आहुजचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. एफआयआरमध्ये गौरव याचा मित्र भाग्येश हा कारमध्ये बसला होता. त्याने रस्त्यावर लघुशंका केली नाही. आरोपी तपासणीसाठी केव्हाही उपलब्ध होईल. त्यामुळे तो जामिनासाठी पात्र ठरतो, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून अॅड. पुष्कर दुर्गे यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरुला असून भाग्येश ओसवाल याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.





