Pune : ऑनलाईन तिकिट खरेदीला मेट्रो प्रवाशांची सर्वाधिक पसंती

पुणे : मेट्रोची प्रवासी संख्या वाढत असतानाच त्यांच्याकडून प्रवाशांकडून ऑनलाईन तिकिट खरेदीला अधिक प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते. मागील चार महिन्यात एनसीएमसी कार्डनंतर व्हाॅट्सॲपवरून होत असलेल्या तिकिट विक्रीतून मेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे.
जानेवारी ते एप्रिल २०२५ मध्ये एनसीएमसी कार्डद्वारे मेट्रोला सर्वाधिक ५ कोटी ६६ लाख ५८ हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यापाठोपाठ व्हाॅट्सॲपवरून १ लाख २३ हजार ५३३ तिकिटविक्री झाली असून, त्यातून मेट्रोला ५ कोटी ३८ लाख ३८ हजार ७१४ रूपये उत्पन्न मिळाले.
मेट्रो स्टेशनवरील खिडकीवरून होणारी तिकिट विक्री जास्त असली तरी मिळणारे उत्पन्न कमी आहे. कारण, व्हाॅट्सॲपवरून ग्रुप बुकिंग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. परिणामी ऑनलाईन तिकिट सेवेमुळे मेट्रोला प्रवाशांची अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते.
मेट्रोचे उत्पन्न
व्हाॅट्सॲप : ५ कोटी ३८ लाख ३८ हजार ७१४
एनसीएमसी कार्ड : ५ कोटी ६६ लाख ५८ हजार ७३५
स्थानकावर : ४ कोटी ७२ लाख ७६ हजार ५७३




