कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव ते पुणे मेट्रो; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १९ महत्वाचे निर्णय

State Cabinet Decision | आज मंत्रिमंडळच्या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकाची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देणे, दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता, मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी यासारखे एकुण 19 निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.
मागील अनेक बैठकीत निर्णयांचा सपाटा लावणाऱ्या महायुती सरकारकडून या बैठकीतही महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेच्या घोषणेकडे लक्ष असतानाच राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर बैठक बोलवण्यात आली होती. ही मंत्रिमंडळाची शेवटची कॅबिनेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय –
1. मुंबईतील ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)
13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)
हेही वाचा:





