Pune | शिवाजीनगर न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन साजरा

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा सन्मान ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमचे प्रस्ताविक पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी केले. यावेळी लक्ष्मीकांत देशमुख साहेब यांनी वकील बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. ए देशमुख साहेब “मराठी भाषा व मराठी भाषेतील न्यायनिवाडे’ यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पुणे बार असोसिएशन निवडणूक 2022-2023 चे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड.अशोक संकपाळ, तसेच रांजणगाव देवस्थान प्रमुख विश्वस्त ॲड. विजय दरेकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲड. फक्कडराव साकोरे यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.
या कार्यक्रमात करोनाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रताप सावंत यांनी केले. उपस्थितांचे आभार पुणे जिल्हा बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष ॲड. विकास ढगे पाटील यांनी मानले.





