Gas Shortage Pune : गॅस एजन्सी आणि सिलेंडर वाहतूक गाड्यांना पोलीस संरक्षण; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Gas Shortage Pune : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे.

Gas Shortage Pune : राज्यात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅस एजन्सी, वितरण कर्मचारी आणि सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. Gas Shortage Pune
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले असून त्याचा परिणाम भारतातही जाणवत आहे. विशेषतः घरगुती एलपीजी सिलेंडर मिळण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही पाहायला मिळत आहे. Gas Shortage Pune
या परिस्थितीत काही ठिकाणी गॅस वितरकांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गॅस एजन्सी, वितरण कर्मचारी तसेच सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाने परिपत्रक जारी केले असून गॅस पुरवठा पूर्ववत होईपर्यंत हे धोरण लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Gas Shortage Pune
पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून त्यात पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. Gas Shortage Pune
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना गॅस टंचाईबाबत घाबरू नये, असे आवाहन केले आहे. काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी नागरिकांनी गॅसचा साठा करून परिस्थिती बिघडवू नये, असेही सांगितले. Gas Shortage Pune
तथापि, पुण्यासह काही भागांत नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासन आणि सरकारसमोर गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. Gas Shortage Pune





