Pune : लिंबू, पपई, चिकू महाग; कलिंगड, खरबूज स्वस्त
Updated On:

पुणे : आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे येथील फळ बाजारात लिंबू, पपई आणि चिकूच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वातावरणातील बदलामुळे मागणी कमी असल्याने कलिंगड आणि खरबुजाच्या भावात घट झाली आहे.
मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. ८) मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबांची सुमारे ८०० ते १ हजार गोणी, कलिंगड ७ ते ८ टेम्पो, खरबूज ५ ते ७ टेम्पो, चिकू ५०० बॉक्स, पेरू ४०० ते ५०० क्रेटस, अननस ४ ट्रक इतकी आवक झाली होती.





