Pune : उबाठा गटातील गळती सुरूच; कसबा मतदार संघातील महिला आघाडी, पदाधिकारी करणार शिंदेसेनेत प्रवेश

Pune | गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडसिठ्ठी देत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे उबाठा गटातील गळती सुरू असल्याचे चित्र आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का बसला आहे.
कसबा मतदार संघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख, शिवशैविक उद्धव यांची साथ सोडून शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित हा प्रवेश मुंबईत पार पडणार आहे.
पुण्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक तसेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी मुंबईत बाळासाहेब भवन येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. निलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडीतील पदाधिकारी आपल्या हाती धनुष्यबाण घेणार आहेत.
आज प्रवेश करणारी महिला आघाडी कसबा मतदारसंघ उबाठा
आश्विनी मल्हारे, प्रतीक्षा महाले, भक्ती जगदाळे, सुप्रिया खेडकर, समीरा प्रधान, दिपाली पोटे, नूतन शरद दिवार, वैजयंती फाटे





