Pune : भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद
Updated On:

पुणे : राज्यातील भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग या संघटनेने गुरुवारपासून (दि.15) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे भूमिअभिलेखच्या पुणे विभागातील सर्वच कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.
दरम्यान, पुण्यातील भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे परिसर आंदोलकांच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे.
दरम्यान, या आंदोलनास राज्यातील भूमिअभिलेखच्या सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्याक्ष सुधीर पाटील यांनी दिली आहे.



