Pune: कात्रज गाय दूध विक्री दरात दोन रूपये वाढ

कात्रज – कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ कात्रज डेअरीमध्ये दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीमध्ये गायीच्या दूध पिशवी विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली.
यावेळी विविध सहकारी व खासगी संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चितळे डेअरी, पराग मिल्क, गोविंद दूध, नेचर डिलाईट, ऊर्जा दूध, राजहंस दूध, संतकृपा दूध, एसआर थोरात दूध, कात्रज दूध, गोदावरी दूध, अनंत दूध, सोनाई दूध, अक्षरा मिल्क, सुयोग मिल्क या बॅन्डचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शासनाने जाहीर केलेले गाय दूध अनुदानाचे धोरण दि. ०१/०७/२०२४ पासून लागू केलेले आहे. त्यानुसार दूध खरेदी दरात रु. ३/- ची वाढ ही सर्व संघांना स्वतः द्यावी लागणार आहे. रु. ३/- खरेदी दरात वाढ झालेली असली तरीही विक्री दरात मात्र रु. २/- वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गायीच्या दुधाचा दर ५४ रुपये लिटर भरून आता ५६ रुपये लिटर या दर असणार आहे.





