Pune: जनसेवा सहकारी बँकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Pune: दरवर्षीप्रमाणे यंदाही बँकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्टॉलवर नागरिकांसाठी पेयपानाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Pune: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर (पुणे) यांच्या वतीने पुणे रेल्वे स्थानक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बँकेचे संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व सेवक बंधू यांच्या उपस्थितीत सामूहिक अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक ऐतिहासिक चळवळी उभारल्या.
शिक्षणाला त्यांनी विशेष महत्त्व देत “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश समाजाला दिला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थितांनी आठवण करून दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बँकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्टॉलवर नागरिकांसाठी पेयपानाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





