Pune : हात, हृदय आणि मेंदू या त्रिसूत्रीवर शिक्षण देणे गरजेचे, सोनम वांगचुक यांचे मत

पुणे : नवी शिक्षण पद्धती खूप चांगली असली तरी त्याची प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी तितकीच महत्त्वाची आहे, असे मत लडाख येथील एचआयएचे संस्थापक संचालक सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, युनेस्को युनिवोकचे फेडरिक युब्लर, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग व सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार उपस्थित होते.
वांगचुक म्हणाले, विद्यापीठ हे केवळ माहितीचे स्त्रोत राहिले आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षण पद्धतीत बदल घडावे. आता शिक्षकांनी या माहितीचा भार गुगल आणि एआयवर सोपवून मुलांना प्रत्यक्षात रिअल लाईफसाठी उपयोगी स्कील डेव्हलपेंटचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळेच अत्याधुनिक काळात शिक्षकांनी स्वतःची भूमिका बदलने गरजेचे आहे. शिक्षक म्हणत असतात आमचे सिलॅबस पूर्ण होत नाहीये. तर यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. मुलांना आता हात, हृदय आणि मेंदूचे शिक्षण देणे गरजेचे आहे. आपण मेंदूच्या वापराचे शिक्षण देतोच परंतु, त्याबरोबर हृदयाचे वापराचे शिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते एक चांगले व्यक्ती बनतील आणि त्यांच्या हातात वैशिष्ट्यपूर्ण कामांची सवय लागेल. मुलांना बाहेर नेऊन प्रत्यक्षात त्यांना स्कील डेव्हलपेंटचे शिक्षण देणे गरजेचे आहे.
डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या, राज्य शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी राबविल्या जाणार्या योजनेतून समाजाला चांगले फलित मिळते. स्त्री सक्षमतेवर त्यांनी त्यामुळे मंत्र्यांनी समोर येऊन सर्वांच्या प्रगतीसाठी नव्या गोष्टी मांडाव्यात. डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, आधुनिक काळात इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य कर्मचारी देण्यावर अधिक भर देऊन प्रशिक्षित करण्याचे कार्य केले जाते. राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्या दिशेने विद्यापीठाचे कार्य करीत आहे.





