पुणे: टीईटी घोटाळा प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे सुरू – अजित पवार

पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणात पुणे पोलीस पारदर्शकपणे तपास करीत आहे. तपासामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. पोलीस योग्य ती कार्यवाही करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.
विधानभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. टीईटी प्रकरणामध्ये आयएएस अधिकारी सुधील खोवडेकर यांना अटक केली आहे. याप्रकरणात पोलिसांवर दबाब आहे का? असे विचारले असता पवार म्हणाले, पोलिसांवर कोणताही दबाब नाही.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची टीम चांगले काम करत आहे. तसेच राज्याचे मुख्य सचिव यांनी या प्रकरणाची माहिती घेतली यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, राज्याचे मुख्य सचिव यांना प्रशासनात काय घडतय, याची माहिती घेण्याचा अधिकार आहे.
याविषयी मुख्यमंत्र्यांनी सुध्दा मुख्य सचिवांना विचारले तर त्यांनी माहिती सांगायला नको का? तपासाची माहिती घेणे वेगळे आणि हस्तक्षेप करणे वेगळे असते.





