Pune : सायबर पोलिसांकडून तपास ; हरविलेले ४५६ मोबाइल सापडले

पुणे : सीईआय आर पोर्टलवरील तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी एका महिन्यांत ४५६ हरवलेले मोबाइल परत मिळविले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हे मोबाइल नागरिकांना परत करण्यात आले. मागील महिन्यांत शहरातून २३०० मोबाइल हरविले किंवा चोरीला गेले होते. त्यापैकी सुरू असलेले व ट्रेस झालेले मोबाइल परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
हरविलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाइल फोनची तक्रार करण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या वेबसाइटवर लॉस्ट अँड फाउंड हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलवर हरविलेल्या फोनबाबतची तक्रार नागरीकांना यावर मिळणारा ऑनलाइन दाखला व स्वत:चे आधार कार्ड याद्वारे नोंदवावी लागते. यानुसार हरविलेल्या फोनचे तांत्रिक विश्लेषण करून मोबाइलचा शोध घेतला जातो.
ही सर्व माहिती पोलिसांना सीईआयआर पोर्टलद्वारे प्राप्त होते. याकामाकरिता संयुक्त सहा पथके तयार केलेली आहेत. यापुढेही शोध कार्यक्रम सातत्याने चालू राहणार असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये हे मोबाइल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, संगणक शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, राहुल शिंदे, किरण जमदाडे, संदिप कोळगे, प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, चेतन चव्हाण, नितीन जगदाळे, राजेंद्र पुणेकर, लटू सूर्यवंशी, समीर पिनाणे, इश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वर चुटके, किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर तसेच सुमषा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख या





