Pune : फ्लॉवर, गाजर आणि मटारच्या दरात वाढ

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. यात हिरवी, मिरची, शेवगा, भुईमूग शेंग आणि कैरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र, मागणी कमी असल्याने दर घटले होते. फ्लॉवर, गाजर आणि मटारच्या दरात वाढ झाली असून, अन्य सर्वच प्रकारच्या भाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १८ ते २० टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, राजस्थान येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, हिमाचल प्रदेश २ टेम्पो मटार, कर्नाटक व तामिळनाडू येथून ७ ते ८ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो, तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५५० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, मटार २ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा सुमारे ५० ते ५५ ट्रक आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : १२०-१५० बटाटा : १२०- २०० लसूण : ४००- ८००, आले सातारी: २८०-३००, भेंडी : २००-४००, गवार : २५०- ५००, टोमॅटो : ५०- १००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी २००-२५०, काकडी : १००-१६०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ४०- ८०, वांगी : २००-३५०, डिंगरी : ३५०-४०० नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : १६०-१८०, शेवगा : १००-२००, गाजर : २५०-४००, वालवर : ३५०-४००, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००- १५०, आर्वी : २००-२२०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार : स्थानिक: ६००-६५०, परराज्य : ७००-७५०, पावटा : ५००-५५०, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : २५०-३५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६०० रु.
मेथी आणि शेपू महागली
मार्केट यार्डात मेथी आणि शेपूच्या भावात वाढ झाली असून, कांदापात आणि अंबाडीच्या भावात घट झाली आहे. कोथींबीर, चाकवत, करडई, पुदिना, मुळा, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारात कोथिंबिरीची सुमारे सव्वालाख जुडी, तर मेथीची ५० हजार जुडी आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : १२००-१५००, शेपू : ८००- १०००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ४००-६००, करडई : ३००-६००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ४००-५००, मुळा : ८००-१२००, राजगिरा : ४००- ६००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१२०० रु.
संत्री, पपईचे दर वाढले
चिक्कू आणि खरबुजाच्या भावात घट
फळबाजारात रविवारी चिक्कू आणि खरबुजाच्या भावात घसरण झाली असून, संत्री आणि पपईच्या भावात वाढ झाली आहे, तर लिंबू, अननस, मोसंबी, कलिंगड, डाळिंब आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़.
येथील फळबाजारात मोसंबी ३० ते ४० टन, संत्री २० ते ३० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ९ ते १० टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ३० ते ४० टेम्पो, खरबूज ४० ते ५० टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, अननस ८ ट्रक, पेरू २५० ते ३०० क्रेट आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रतिगोणी) : ५००-२०००, मोसंबी : (३ डझन) : १४०-३२०, (४ डझन) : ६०-१४०, संत्री : (१० किलो) : ६००-१५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-३०, कलिंगड : ८-१३, खरबूज : ८-१६, पपई : ८-२०, चिक्कू (दहा किलो) : १००-३००, अननस (१ डझन): १००-६०० रु.
फुलांचे भाव घटले
गुढी पाडव्यानंतर फुलांना मागणी कमी झाली असून, दरातही घट झाली आहे. मात्र, शोभिवंत फुलांना मागणी चांगली आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : ४०-५०, अॅष्टर : जुडी ५-१०, सुट्टा ५०-६०, कापरी : ३०-४०, शेवंती : ६०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-४०, डच गुलाब (२० नग) : ८०-१००, जर्बेरा : ६०-७०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी २५०-३००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१२०, जिप्सोफिला : २००-३००, मोगरा : ७००-८०० रु.




