पुणे : ‘म्युकरमायकोसिस’वरील औषधांचा पुरवठा अपुरा
Updated On:

उपलब्ध औषधांचे रुग्णांना वितरण
पुणे – जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या 550 पेक्षा अधिक आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत म्युकरमायकोसिस वरील औषधांचा पुरवठा होत नाही. जिल्ह्यात अजूनही म्युकरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा कायम आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऍम्फोटिसिरीन-बी (लिप्सोमल) 232 इंजेक्शन, ऍम्फोटिसिरीन-बी (इम्युलेशन) 17, ऍम्फोटिसिरीन-बी (प्लेन) 61 इंजेक्शनचे वितरण करण्यात आले.
ऍम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनशिवाय पॉसॅकोनाझोल गोळ्यांचे 32 स्ट्रिप्सचे वितरण करण्यात आले. पॉसॅकोनाझोल लिक्वीडच्या एका बाटल्याचे वितरण झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.




