Pune : वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार

विश्रांतवाडी – राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महानिर्धार मेळावा खराडी येथे पार पडला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉँंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
यामध्ये माजी नगरसेविका संजीला पठारे, सुमन पठारे, सुनंदा देवकर, माजी नगरसेवक किशोर विटकर, माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे चिरंजीव तुषार खरात, माजी नगरसेवक सुदाम लोखंडे यांचे चिरंजीव रमेश लोखंडे, मनापचे माजी स्वीकृत सदस्य जमील अब्बासी, डॉ. जानराव चौधरी, वडगावशेरी मतदारसंघ राष्ट्रवादीचे सरचिटणीस विक्रांत गव्हाणे, शिक्षण मंडळ सदस्य नानासाहेब नलावडे.
माजी सभापती अनुसया बारणे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील खांदवे, बाजार समितीचे नानासाहेब आबनावे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे, निलेश पवार, निखील गायकवाड, माजी सरपंच धर्मराज वाजे, प्रकाश सातपुते, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुभाष काळभोर, विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष सोमनाथ साबळे.
माजी पंचायत समिती सदस्य सोपान गलांडे, वडगावशेरी महिलाध्यक्ष स्मिता सोंडे, यशवंतचे माजी संचालक शिवाजीराव चांधारे, आरपीआयचे साहिल शेख, शिंदे शिवसेनेचे लक्ष्मण खेडकर, इशरत खान, महंमद अली, मनसेचे राजेंद्र राजपुरोहित आदींचा समावेश आहे.
मुंबई येथील पक्षप्रवेशानंतर…
वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासमवेत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष युवा नेते सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांनी खासदार शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी कॉँंग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला होता. पठारे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर याचे स्वागत मतदार संघात स्वागत करण्यात आले तसेच अनेकांनी जाहीररित्या पक्ष प्रवेश केला.





