Pune : होंडा अमेझ डेक्कन होंडा येथे उपलब्ध; कार देखभालीचा खर्च राहणार कमी

पुणे : होंडा कार्स इंडिया या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार्स उत्पादक कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित नवीन थर्ड जनरेशन होंडा अमेझ पुण्यातील डेक्कन होंडा येथे उपलब्ध केली. स्टायलिश व प्रीमियम कॉम्पॅक्ट सेदान आऊटक्लास आणि उत्साहवर्धक सेदान अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
जी तरुण, तसेच जीवनातील प्रत्येक पैलूचा आनंद घेऊ पाहणाऱ्या कुटुंब-केंद्रित वापरकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करते. नवीन अमेझ थायलंडमध्ये असलेल्या होंडा आरअँडडी आशिया पॅसिफिक सेंटरने विकसित केली आहे. ज्यामधून वापरकर्त्यांना त्यांचे यश व अत्याधुनिकता व्यक्त करण्यास सक्षम करण्याचा होंडाचा दृष्टिकोन दिसून येतो.
प्रबळ 3-बॉक्स डिझाइनसह अमेझ अस्सल सेदान शेप देते, ज्यामधून 4 मीटर लांब अंतर्गत राहण्यासोबत उच्च दर्जा दिसून येतो. या वेईकलमध्ये प्रोग्रेसिव्ह व क्लासीचे प्रमुख घटक आहेत, जेथे स्पोर्ट एक्स्टीरिअर डिझाइन, अत्याधुनिक व ऐसपैस इंटीरिअरमधून आऊटक्लास प्रीमियम अनुभव मिळतो. तसेच तंत्रज्ञानामधून समाधान आणि आरामदायी विश्वसनीय राइडचा अनुभव मिळतो.
होंडा कार्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ताकुया त्सुमुरा यानी ही कार नवी दिल्लीत सादर करतांना सांगितले की, नवीन अमेझमध्ये सेगमेंट फर्स्ट- होंडा सेन्सिंग ॲडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम (एडीएएस) आहे. ज्यामुळे अमेझ भारतातील किफायतशीर एडीएएस सुसज्ज पॅसेंजर कार आहे.




