Pune : कचरामुक्त कसब्यासाठी हेमंत रासने सरसावले

Updated On:
Pune : कचरामुक्त कसब्यासाठी हेमंत रासने सरसावले

पुणे – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच कसब्याचे भाजप-महायुतीचे आमदार हेमंत रासने हे तत्काळ मतदार संघाच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी रात्री मुंबईतून परतल्यानंतर रासने यांनी मंगळवारी सकाळी मतदारसंघ पिंजून काढला असून “कचरामुक्त कसबा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

कसबा मतदारसंघ पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पुढील पंधरा दिवसांत कृती आराखडा सादर करा, अशा सूचना रासने यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, परिमंडळ उपायुक्त डाॅ. चेतना केरूरे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कसबा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात व्यापारी पेठा आहेत. या भागात दिवसभर राज्यभरातून येणाऱ्या ग्राहकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या मतदारसंघात रात्रीच्या वेळेत कचरा रस्त्यावर असतो. तर महापालिकेकडून सकाळी स्वच्छता केली जाते. पण, कचरा उचलण्यास दिरंगाई झालेल्या अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात त्यामुळे मतदारसंघात “कचरामुक्त कसबा’ अभियान रासने यांनी हाती घेतला आहे.

त्यासाठी पहाटेपासूनच त्यांनी मतदासंघातील गणेशपेठ, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, सोमवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, टिंबर मार्केट परिसराची पाहणी केली. त्यानंतर हा कचरा वेळेत उचलण्यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनादिल्या आहेत.

“कसबा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा आहे. येथे जगभरातून नागरिक भेट देतात, त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ कचरामुक्त करण्याचा आपला संकल्प आहे.” – हेमंत रासने, आमदार, कसबा मतदारसंघ.

आणखी संबंधित बातम्या

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज

2026-10-07 07:22:43

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज

October Heat: शहरात ऑक्टोबर हिटचा चटका ; उष्णतेचा पारा ३६ अंशावर

2026-10-07 07:18:12

October Heat: शहरात ऑक्टोबर हिटचा चटका ; उष्णतेचा पारा ३६ अंशावर