Pune: घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार
Updated On:

पुणे – घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून, दावडी येथे सर्वाधिक १९६ मिमी पावसाची नोंद झाली. ताम्हिणी घाटमाथ्यासह लोणावळा, कोयना, शिरगाव, भिरा, अंबवने, वळवण या परिसरात शंभर मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
घाटमाथ्यावर दिवसभर पावसाची संततधार तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे फेसाळणाऱ्या धबधब्यांनी रूद्र रूप धारण केले. विशेषत: ताम्हिणी घाट, अंबवने, लोणावळा आणि शिरगाव परिसरात जोरदार पावसाने धबधबे मोठ्या प्रमाणात आहेत. तर दावडी परिसरातही जोरदार पाऊस असल्याने नद्या, ओढ्यांना पुर आलेत.
गेल्या २४ तासात दावडी येथे सर्वाधिक १९६ मिमी पावसाची नोंद झाली. तर शिरगाव येथे १८०, ताम्हिणी घाट परिसरात १७०, अंबवने घाट परिसरात १५९ तर भिरा येथे १४२ मिमी पाऊस झाला. लोणावळा परिसरात १२६, कोयना धरणक्षेत्रात १३१ आणि वळवण परिसरात १०१ मिमी पावसाची नोंद झाली.
टॅग्स:





