Pune: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; ताम्हिणी घाटात सर्वाधिक 170 मिमी पाऊस

पुणे – घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने डोंगरमाथ्यावरून पडणारे धबधब्यांचा प्रवाह वाढला आहे. गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात सर्वाधिक 170 मिमी पावसाची नोंद झाली. तर बहुतांश घाटमाथ्यावर शंभर मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने या भागातील भात रोपांच्या पेरण्यांना सुरवात झाली.
मागील आठवड्यात घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र, दोन दिवसांपासून पुणे, सातारा, कोल्हापूरसह कोकण-गोव्यातील घाटमाथ्यावरही खूप जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे फेसाळणाऱ्या धबधब्यांचा प्रवाह जोराने वाढला आहे. विशेषत: ताम्हिणी घाट परिसर, डुंगरवाडी, लोणावळा, धावडी, ठाकुरवाडी आणि कोयना परिसरातील घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहतताअहेत.
गेल्या 24 तासात घाटमाथ्यावर झालेला पाऊस (मिमी मध्ये)
ताम्हिणी – १७०, डुंगरवाडी – १४१, शिरगाव – ११२, अंबवने – १०८, भिरा – १०३, भिवपुरी – १००, धारावी – ९६, लोणावळा आणि खंद – ९३, वळवण – ७८, कोयना – ७०, ठाकुरवाडी – ६८, शिरोटा – ६५, खोपोली – ४०,





