PUNE GRAMIN : लोणीकंद येथील होली स्पिरीट स्कुल मध्ये ‘योग दिन’ साजरा

लोणीकंद : लोणीकंद (ता.हवेली) येथील ‘होली स्पिरीट कॉन्व्हेंट स्कुल’मध्ये आज (शुक्रवार ता. २१) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग विषयीचे महत्त्व विशद करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघाने सन २०१५ पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करत असताना लोणीकंद परिसरातील अनेक शाळा कॉलेज मध्ये १० वा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.
तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले.
म्हणून २१ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्यात येतो. यावेळी स्कुल मधील शिक्षक व २००० विद्यार्थ्यांनी उभे राहून पाच आसन तर खाली बसून पाच आसन केले यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, अनु विलोम, भ्रमरी यांसह वेगवेगळ्या योगासनांची माहिती स्कुल चे शिक्षक योग शिक्षक प्रताप फडतरे सर यांनी दिली.
यावेळी होली स्पिरीट स्कुल च्या प्रिन्सिपल लिली सिस्टर, सहशिक्षिका वैष्णवी भोसले, कल्पना सुतळे यांसह २००० विद्यार्थ्यांनी योगासने करून जागतिक योग दिन साजरा केला.





