Pune Gramin : केसनंदच्या सरपंच पदी सुनिता हरगुडे यांची बिनविरोध निवड

वाघोली : केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी असणारे प्रमोद हरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनिता बाबासाहेब हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
केसनंद ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले एक वर्ष हुन अधिक काळ प्रमोद हरगुडे यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील विविध प्रश्नांची सोडवणूक ग्रामपंचायत सदस्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या पाठबळावर केली होती.
अशाच प्रकारची कामगिरी यापुढील काळात सुनिता हरगुडे यांच्याकडून होणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सुनिता हरगुडे यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. केसनंद ग्रामपंचायत माजी सरपंच प्रमोद हरगुडे व इतर यांच्या हस्ते निवडीबद्दल सुनीता हरगुडे यांचा सत्कार करण्यात आला.




