वाघोली (प्रतिनिधी) :- केसनंद (ता. हवेली) येथील मुलगी ही तिची आई रागावल्याने राहते घरातून निघून गेली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने तीन पथके तयार करून चार तासात मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजीतवाड यांनी दिली आहे. शर्वरी वैजनाथ कदम (वय 12, रा. केसनंद) असे या मुलीचे नाव आहे. तपास पथकाने या मुलीचा केसनंद भागात कॅमेर्याद्वारे शोध घेऊन शेवटचा कॅमेरा पाहून शिवालय मंदिर केसनंद येथे चौकशी केली असता तेथे मुलगी मिळून आली. मुलीला अभ्यास करण्याच्या कारणावरून तिच्या आईने रागावल्याने ती घरातून निघून गेलेली होती. मुलगी सुखरूप आहे. तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. अवघ्या चार तासात लोणीकंद पोलिसांनी मुलीचा शोध लावल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात आले. Baramati News : बारामती परिसरात अडीच लाखांची घरफोडी, सोन्या-चांदीचे दागिने लंपास सदरची कामगिरी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, प्रांजली सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग), पंडीत रेजितवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन), रवींद्र गोडसे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), तुकाराम सुरवसे (पोलीस उपनिरीक्षक), संजय चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक) यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी यांनी केली आहे.