पुणे | खोटी कागदपत्रे देऊन महापालिकेची फसवणूक? नगरसेवक अविनाश बागवे यांचा आरोप

Updated On:
पुणे | खोटी कागदपत्रे देऊन महापालिकेची फसवणूक? नगरसेवक अविनाश बागवे यांचा आरोप

पुणे : महापालिकेस खोटी कागदपत्रे सादर करून सत्यम कन्सल्टंट या कंपनीने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडील त्रयस्थ गुणवत्ता तपासणी ( थर्ड पार्टी कन्सल्टंट) म्हणून कोटयावधीची कामे मिळवून फसवणूक केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

तसेच या संस्थेस मदत करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव असून महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचाही त्यास सहभाग असल्याने या प्रकरणी संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी बागवे यांनी यावेळी केली.

बागवे म्हणाले की, 2018 मध्ये महापालिकेच्या सल्लागार पॅनल मध्ये घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. त्यानंतर या कंपनीने कामे मिळविण्यासाठी चूकीची कागदपत्रे दिल्याची तक्रार आपण केली होती. त्यानंतर या कंपनीची फाईलच गहाळ झाली. त्यावेळी तत्कालीन पथ विभागाच्या प्रमुखांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. 

ही फाईल अद्यापही सापडलेली नाही. त्यामुळे आपल्या तक्रारीनंतर प्रशासनाने या कंपनीस कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र, सल्लागार कंपनीने पालिकेलाच आपली कागदपत्रे हरविली म्हणून नोटीस पाठविली. त्यानंतरही कंपनीने जीएसटी, आयटी रिर्टन, कर्मचाऱ्यांचा पीएफ, वेगवेगळी पॅनकार्ड तसेच संचालकांची नावे दाखवून क्षेत्रीय कार्यालयांची कामे मिळविली.

तसेच प्रशासनाने आपली तक्रार असतानाही वेळोवेळी तक्रारी बाबत उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे या कंपनीने ज्या कामांचे परिक्षण केले, ती कामे झालेलीच नसल्याचा दावा बागवे यांनी यावेळी केला. तसेच त्याबाबत पुरावेही पत्रकार परिषदेत सादर केले.

दरम्यान, या कंपनीने पालिकेची कोटयावधीची फसवणूक केली असून हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे, पालिकेने तातडीनं या संस्थेला काळया यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच कंपनीने महापालिकेकडून घेतलेले शुल्क वसूल या प्रकरणी सल्लागर कंपनीस मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

सल्लगार कंपनीने फेटाळले आरोप

दरम्यान, या प्रकरणी सत्यम कन्सल्टंटने आरोप फेटाळून लावले आहे. महापालिकेच्या नियमानुसारच सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतरच आमची पालिकेत नियुक्ती झालेली आहे. 2018 मध्ये बागवे यांनी अशीच तक्रार केली होते. त्यानंतर आम्ही सर्व कागदपत्रे दिली. त्यावर त्यांचे समाधान झाल्याचे पत्र बागवे यांनी पथ विभागास दिलेले आहे. तर आम्हाला जीएसटी मध्ये सवलत असून आम्ही कर भरल्याची सर्व कागदपत्रे वेळोवेळी सादर केली आहेत. या कागदपत्रांची छाननी आणि यंत्रणा पाहता खोटी कागदपत्रे सादर करणे शक्‍य आहे का हा विचार त्यांनी करावा, तसेच फाईल गहाळ झाल्याशी आमचा काहीही संबध नाही. हा पूर्णत: प्रशासकीय भाग असून आमची सर्व कागदपत्रे पालिकेकडे आहेत ती त्यांनी केव्हाही पहावी.

– सचिन लोणकर ( संचालक, सत्यम कन्सल्टंन्सी)

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट