पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. तर मुलीचे अपहरण केल्याच्या कलमानुसार तिच्या मैत्रिणीसह अन्य एकाला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी काम पाहिले. रिजवान इक्राबद्दीन अन्सारी (वय ३५, रा. उत्तमनगर), दशरथ आत्माराम चव्हाण (वय २२, वडगाव बुद्रुक) या दोघांना २० वर्षे शिक्षा झाली आहे. रिजवानला १३ हजार ५०० रुपये आणि दशरथला १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. मैत्रिण उज्वला रविंद्र आतकरे (वय २३, सिंहगड रोड) आणि साजिद बुंदु अन्सारी (वय २६, रा. एरंडवणा) दोघांना १० वर्षे सक्तमजुरी आहे. उज्वलला ७ हजार ५०० आणि साजिदला ३ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दंडापैकी पीडितेला २० हजार रुपये देण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे. जनता वसाहत येथे राहणाऱ्या या प्रकरणातील १६ वर्षीय पीडितेची उज्वला मैत्रिण आहे. पीडित रस्त्याने चालली असताना हातातून मोबाइल पडला. त्यावरून वाहन गेल्याने तो खराब झाला. घरचे रागावतील म्हणून ती मैत्रिण उज्वलाकडे गेली. मोबाईल उद्या दुरूस्त करून देतो, असे म्हणत पीडितेला तिच्या घरी राहण्यास भाग पाडले. उज्वलाने मित्रासोबत संभोग गेला. जबरदस्तीने दुसऱ्या मित्र असलेल्या दशरथ सोबत पीडितेला संभोग करायला भाग पाडले. त्यानंतर मोबाईल दुरूस्तीसाठी तळेगावला जावे लागेल, असे सांगितले. पीडितेने घाबरून त्यास नकार दिला. मात्र, घडलेली घटना घरी सांगेन, असे धमकावून रिक्षा बोलावली. त्यामध्ये रिजवान आणि साजिद होते. ते रिक्षामधून भुगाव येथील एका लॉजवर घेऊन गेले. तिथे रिजवानने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता रिजवानने मारहाण केली. तर साजिद आणि उज्वलाने धमकाविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर पीडितेला सिंहगड रस्ता येथील राजामाम पूल येथे सोडून सर्वजन निघून गेले. त्यानंतर पीडितेने दत्तवाडी पोलिसात फिर्याद दिली. त्यावर तपास करून न्यायालयाने शिक्षा सुनावली