Pune : मागणीअभावी अन्नधान्यांचे दर स्थिर

पुणे : मागणी कमी असल्यामुळे तूरडाळ आणि हरभराडाळीच्या दरात आणखी घट झाली. हिरव्या, तसेच पांढऱ्या वाटाण्याचे दरही आणखी कमी झाले असून, आवक कमी प्रमाणात होत असल्यामुळे मद्रास नारळाचे दर मात्र कडाडले आहेत. मात्र, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे साखर, गूळ, गहू, ज्वारी बाजरीसह अन्य सर्वच जिनसांचे दर स्थिर असल्याचे घाऊक बाजारातून सांगण्यात आले.
सर्वोत्तम प्रत असणाऱ्या मद्रास नारळाचे दर नेहमीच सर्वाधिक असतात. खोबरे जाड आणि चविष्ट असल्यामुळे या नारळास प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते. या नारळाचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकातील आरसिगीरी, टिपटूर, असांडी, होसादूर्गा या भागांत होते आणि तेथूनच संपूर्ण देशभर हा माल पुरविला जातो. यंदा या नारळाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले असून, आतापासूनच तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत या नारळाच्या दरात शेकड्यामागे आठशे ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारात मद्रास नारळाचा प्रती शेकडा दर ४९०० ते ५१०० रुपये इतका आहे.
यापाठोपाठ सापसोल या नारळाचा दरही वाढला असून, शेकड्याचा दर ४५००-५००० रुपयांपर्यंत वधारला आहे. हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक मानला जात आहे. मद्रास व सापसोल नारळ महागल्याने हलक्या व मध्यम प्रतीच्या नारळाचे दरही शेकड्यामागे शंभर रुपयांनी वाढले आहेत. यात्रा, उत्सव, आगामी गुढीपाढवा या सणांमुळे नारळास सध्या मागणी वाढली आहे. पुण्याच्या घाऊक बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच तामिळनाडू या राज्यांतून दररोज सुमारे सात ते आठ ट्रक इतकी नारळाची आवक होत असल्याची माहिती अतुल ट्रेडिंग कंपनीचे भागीदार संजय गुदेचा यांनी दिली आहे. दरम्यान, तूरडाळ, हरभराडाळ दरात आणखी घसरण झाली आहे. यंदा तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यातच आयातही सुरूच आहे.
त्यामुळे तूरडाळ आणि हरभरा डाळीच्या दरातील घसरण थांबलेली नाही. गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे आणखी दोनशे रुपयांनी घट झाली. आवक मुबलक प्रमाणात होत असून, मागणी कमी असल्यामुळे हिरव्या वाटाण्याच्या दरात क्विंटलमागे आणखी पाचशे रुपयांनी घट झाली आहे. पांढऱ्या वाटाण्याच्या दरातील तेजी थांबली असून, दरात क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली. अन्य सर्व डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते. आवक, जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही.
उसाच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळे बंद होत आहेत. परिणामी गुळाचे उत्पादन मंदावल्याने बाजारात गुळाची आवक थंडावली आहे. आगामी सणांनिमित्त गुळास मागणी चांगली आहे. मागणी कमी असल्यामुळे शेंगदाणा तेलासह अन्य सर्व खाद्यतेलांचे दर गेल्या आठवड्यातही सर्वसाधारणपणे स्थिर होते. पामतेलाचे दर उत्पादक देशातच चढे असल्यामुळे आयात मंदावली असून, सोयाबीन तेलाची आयात मात्र नियमितपणे होत आहे. वनस्पती तूप, तसेच खोबरेल तेलाच्या दरातही बदल आढळला नाही.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे–
साखर (प्रतिक्विंटल) ४१००- ४१५० रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २४००-२५००, रिफाइंड तेल २१५०-२७५०, सरकी तेल २०००-२३००, सोयाबीन तेल २०००-२३००, पामतेल २०००-२२५०, सूर्यफूल रिफाइंड तेल २१५०- २३००, वनस्पती तूप २२००-२४००, खोबरेल तेल ३९०० रु.
तांदूळ :- गुजरात उकडा ३५००- ४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसुरी ४५००-५०००, एचएमटी कोलम ५५००- ६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१)-११०००- ११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ९०००-९५००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१०००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९)-८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
गहू :- लोकवन नं. १- ४०००-४२००, लोकवन नं. २- ३६००-४०००, नं. ३- ३३००-३६००, सिहोर नं. १- ५७००-६०००, सिहोर नं.२- ३५००० – ५०००, सिहोरी ३८००-४४००, मिलबर ३१०० रु.
ज्वारी :- गावरान नं. १- ५२००-५५००, गावरान नं. २- ४५००-४८००, नं. ३- ३५००-३८००, दुरी नं. १ – ३६००-४०००, दुरी नं. २- ३२००-३५०० रु
बाजरी :-महिको नं. १- ३७००-३८००, महिको नं. २- ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड ३२००-३३०० रु.
गूळ :- गूळ एक्स्ट्रा ४१५०-४४००, गूळ नं. १- ३९००-४१००, गूळ नं. २- ३८००-३८५० गूळ नं. ३- ३७००-
३७७५, नं. ४- ३५५०-३६५०, कऱ्हाड बॉक्स पॅकिंग ४६००-५२००, केडगांव बॉक्स पॅकिंग ३८००- ४४०० रु.
डाळी :- तूरडाळ १००००- ११५००, हरभरा डाळ ६७००-६८००, मूगडाळ ९०००-१०३००, मसूरडाळ
७९००-८०००, मटकी डाळ ७८००-८०००, उडीद डाळ १००००-११३०० रु.
कडधान्ये :- हरभरा ६५००-७०००, हुलगा-५५००-५६०० चवळी ७५००-१२०००, मसूर ७१००-७२००, मूग ८५००-९३००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात ६०००- ६५००, मटकी राजस्थान ६०००- ६५००, मटकी सेलम ११५००-१२५००, वाटाणा हिरवा ८५००-९०००, वाटाणा पांढरा ४४००-४५००, काबुली चणा ८०००-११००० रु.
साबुदाणा :- साबुदाणा नं. १- ५५००, साबुदाणा नं. २- ५०००, साबुदाणा नं. ३- ४८०० रु.
वरई भगर :- १००००, सावा भगर ९५००, गोटा खोबरे १७००-१९०० रु.
शेंगदाणा :- जाडा ८२००-८८००, स्पॅनिश–१०७००-१०८००, घुंगरू ९२००-९३०० टीजे ७५०० रु.
धने :- गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००- १५००० रु.
पोहे :- मध्य प्रदेश ४७००-५०००, पेण ४३००-४५००, मध्यम पोहा ४७००-४९००, दगडी पोहा ४७००- ५१००, पातळ पोहा ५०००-५८००, सुपर पोहा ५३००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ६२५-७२५, भाजके डाळे ३६००-४०००, मुरमुरा सुरती (९ किलोस) ५६०, भडंग ९००-१०५०, घोटी ५५० रु.
रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा- १८५०- १९००, रवा- १९००-१९५०, मैदा- १९५०-२००० रु.
बेसन :- (५० किलोस) ४२००-४४५० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरची :- काश्मिरी ढब्बी २५०००-३००००, ब्याडगी १७०००-२००००, लवंगी तेजा १६०००-१७०००, गुंटूर १५००-१६०००, खुडवा गंटूर ७०००-८०००, खुडवा ब्याडगी ८०००-९००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग २०००-२१००, मद्रास ४९००-५१००, पालकोल जुना २२००- २३००, सापसोल ४५००- ५००० रु.




