Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

पुणे : देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळी दाखल होत आहे. अवकाळी पाऊस आणि वादळाचा परिणाम मासळीच्या उपलब्धतेवर झाला आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात कमी प्रमाणात मासळी येत असल्याने मासळीबाजारातील आवकही घटली आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ढगाळ वातावरणासह पावसाच्या कोसळणार्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने बाजारात चिकनसह अंडींना मागणी वाढू लागली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा होत असल्याने गतआठवड्याच्या तुलनेत चिकनचे भाव किलोमागे दहा रुपये तर इंग्लिश अंडीचे भाव शेकड्यामागे 50 ते 60 रुपयांनी वधारले आहेत.
मागणी व पुरवठा टिकून असल्याने मटणाचे भाव स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 18) खोल समुद्रातील मासळी 5 ते 8 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 1 ते 2 टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 20 टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 2000-2200, मोठे : 1800-2000, मध्यम : 1400-1600, लहान : 1000-1200, भिला : 900-1000, हलवा : 800-900, सुरमई : 800-1500, रावस : लहान 1000-1200, मोठा 1000-1200, घोळ : 1000-1200, करली : 350-400, करंदी (सोललेली) : 450-500, भिंग : 400-500, पाला : 1500-1600, वाम : पिवळी 1200-1400, काळी : 500-600, ओले बोंबील : 200-300. कोळंबी : लहान : 200-350, मोठी : 400-700, जम्बो प्रॉन्स : 1600, किंग प्रॉन्स : 800, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-450, मांदेली : 160-180, राणीमासा : 300-350, खेकडे : 350-400, चिंबोर्या : 700-800. खाडीची मासळी : सौंदाळे : 350-400, खापी : 350-400, नगली : 400-700, तांबोशी : 600-650, पालू : 350-400, लेपा : 300-400, बांगडा : 250-300, शेवटे : 250-300, पेडवी : 120-160, बेळुंजी : 200-250, तिसर्या : 300-350, खुबे : 150, तारली : 250-300. नदीतील मासळी : रहू : 180-200, कतला : 180-200, मरळ : 450-550, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 160-180, खेकडे : 300-550, चिलापी : 100-200, वाम : 600-700. मटण : बोकडाचे 780, बोलाईचे 780, खिमा 780, कलेजी 820. चिकन 230, लेगपीस 280, जिवंत कोंबडी 150, बोनलेस 330. अंडी : गावरान (शेकडा) 1050, डझन 130, प्रतिनग 11. इंग्लिश (शेकडा) 590, डझन 78, प्रतिनग 6.50.





